BULDHANA DONGAON, शहरात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत प्रशासन मुंग गिळून गप्प - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, September 7, 2023

BULDHANA DONGAON, शहरात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत प्रशासन मुंग गिळून गप्प


शहरात घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायत प्रशासन मुंग गिळून गप्प 

(apala vidarbh live network)

बुलढाणा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले डोणगाव या गावची लोकसंख्या तुलनेत सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. मात्र नवा रूपाला असलेली ग्रामपंचाय ही नागरिकांच्या आरोग्याची खेळत असल्याचे चित्र आता पहायला मिळत आहे  शहरात कचरा, घाणीचे साम्राज्य पाहता वायुप्रदूषण व स्वच्छतेबाबत दुर्लक्षच असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी कचरा निर्माण होत असतो, याची विल्हेवाट कचराभूमीवर लावली जाते; परंतु सध्या पावसाळा सुरू असून अनेक ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे. कचरा ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे डासांची पैदास, माशांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक भागात चिखल निर्माण झाला आहे. गावातील अनेक भागात घानीचे साम्राज्य आहे.

 गावातून जात असलेल्या वर्दळीच्या मार्गावर कचऱ्याचे साम्राज्य पाहावयास मिळत आहे. येथून नागरिकांना तोंडावर रुमाल धरत प्रवास करावा लागत आहे.

डोणगावात ठिकाणी घाण असलेल्या वार्डातील  आजूबाजूच्या परिसरात घरगुती, तसेच भाजीपाला, फळे यासह अन्य कचरा पसरलेला असतो. नागरी वस्ती अधिक असल्याने येथे दुर्गंधी, घाण आदींचा सामना करावा लागत आहे; तर औद्योगिक वसाहतीत हीच परिस्थिती आहे. एकीकडे

 ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ असा नारा लावला असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळे आहे. शून्य कचरा मोहीम हाती घेतली, खतनिमिर्तीची कागदावर उजळणी केली तर ओला व सुका कचरा वर्गीकरण होणार, असे स्पष्ट केले असले तरी शहरात स्वच्छतेचा बोजवारा निर्माण झाला आहे. बरेच वाहनेदेखील घेण्यात आली; परंतु कचराभूमीवर अद्यापही पूर्णपणे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही त्यामुळे शून्य कचरा मोहीम कधी यशस्वी होणार यावर प्रश्नचिन्हच आहे. 

डोणगाव शहरातून दररोज घंटागाडीच्या मार्फत कचरा  उचलला जातो व कचराभूमीवर नेण्यात येतो. मात्र कित्येक ठिकाणी कचऱ्याचे ढीग असलेले दिसून येतात मात्र ही जबाबदारी घ्यायची तरी कोणी हा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे

कृतिशील योजनेची अंमलबजावणी डोणगाव  ग्रामपंचायत करत नसल्याने गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. थोडाफार प्रमाणात ग्रामपंचायत प्रशासनाला कचरा न होण्यासाठी यश मिळाले असले   तरी शहरातील बऱ्याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा मात्र कोलमडली आहे. त्यामुळे कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी कृतिशील योजना अमलात आणणे गरजेचे आहे.

डोणगाव ग्रामपंचायतीने याकडे लक्ष न दिल्या मुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न डोके वर काढत आहे. यामुळे डोणगावकरांन मध्ये नाराजीचा सूर पसरला आहे.हे मात्र तेवढेच खरे.. तूर्तास एवढेच. मात्र दुसरा भाग लवकरच

Post Top Ad

-->