BULDHANA पुन्हा खाजगी Travels ट्रॅव्हल्सचा accident..अपघात.. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, September 8, 2023

BULDHANA पुन्हा खाजगी Travels ट्रॅव्हल्सचा accident..अपघात..


सात ते आठ जण गंभीर जखमी..

लोणार तालुक्यातील अंजनी गावाजवळ ट्रॅव्हल्स उलटली..

पुण्याहून अमरावती कडे जात होती खाजगी ट्रॅव्हल्स.. ट्रक आडवा आल्याने अपघात ..

 (आपला विदर्भ  LIVE देवानंद सानप लोणार)

बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा खाजगी ट्रॅव्हल्स चा accident अपघात झालाय .बुलढाणा जिल्ह्यात लोणार तालुक्यातील अंजनी गावाजवळ ही ट्रॅव्हल्स उलटली असून  यामध्ये झालेल्या अपघातात सात ते आठ प्रवासी गंभीरित्या जखमी झाले आहेत. पुण्यावरून साधारण 30 प्रवासी घेऊन ही बस अमरावती कडे जात होती. अंजनी गावाजवळ समोरून ट्रक आडवा आल्याने या खाजगी ट्रॅव्हल्स चा अपघात झाला असल्याच सांगितलं जात आहे..सकाळी साडे 6 वाजता हा अपघात झालाय , या यावेळी गावकऱ्यांनी तात्काळ मदतकार्य करत अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स मधून जखमींना बाहेर काढले आणि तात्काळ त्यांना स्थानिक रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले..


बुलढाणा जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या अपघाताचा मुद्दा ह्या अपघाताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून  प्रवाशांचे जीव धोक्यात घालून खाजगी ट्रॅव्हल्स बेभानपणे रस्त्यावर वाहताना पाहायला मिळत आहेत.. त्यावर कुठलेच निर्बंध वाहतूक पोलिसांकडून लावले जात नसल्याचेही बुलढाण्यात चित्र पाहायला मिळतंय..Post Top Ad

-->