Buldana, राजमाता जिजाऊ जयंतीदिनी पालकमंत्र्यांकडून अभिवादन - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, January 12, 2024

Buldana, राजमाता जिजाऊ जयंतीदिनी पालकमंत्र्यांकडून अभिवादन


राजमाता जिजाऊंचा विचार पुढे नेणार – पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

बुलडाणा, दि. 12 : राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार प्रेरक आहेत. त्यांच्या विचारावरच राज्याची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यांचा विचार पुढे नेण्यात येणार आहे, असे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

श्री. पाटील यांनी राजे लखोजीराव जाधव राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जयंतीदिनी अभिवादन केले. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, नगराध्यक्ष सतिश तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते.

राजमाता जिजाऊंना अभिवादन केल्यानंतर श्री. पाटील यांनी राज दरबाराची पाहणी केली. याठिकाणी राजे लखोजी जाधव यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी केली. त्यानंतर श्री. पाटील यांच्या हस्ते नगर पालिकेच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगर पालिकेच्या पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

Post Top Ad

-->