Buldhana Sindkhedaraja पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची काळाकोट येथील शस्त्रप्रदर्शन, रंगमहालला भेट - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, January 12, 2024

Buldhana Sindkhedaraja पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांची काळाकोट येथील शस्त्रप्रदर्शन, रंगमहालला भेट

 

लखोजी राजे जाधव यांच्या समाधीस्थळी अभिवादन

बुलडाणा, दि.१२: राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीदिनी पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथील काळाकोट परिसरातील शस्रसंग्रहालयातील शिल्प आणि शस्त्र प्रदर्शन, रंगमहालला भेट देत पाहणी केली. तसेच राजे लखोजी जाधव यांच्या समाधीस्थळी जावून अभिवादन केले.

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपवनसंरक्षक श्रीमती सरोज गवस, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, अभिरक्षक अमृत पाटील यावेळी उपस्थित होते. 

दगडी शिल्प व शस्त्रास्त्रे प्रदर्शनात १० ते १३ व्या शतकापासून सापडलेले दगडी शिल्प, शस्रांचे अभिरक्षण, संवर्धन करण्यात आले असून, त्यामध्ये उमा महेश्वर, इंद्राणी, शंकर पार्वती शिल्प, नृत्य गणेश, शिवपार्वती, मकर मुख, विरगल, अश्विनी, लक्ष्मीनारायण, वैष्णवी, मुरलीधर कृष्ण, किचक शिल्प, भैरव, ब्राहमी, वराह अवतार, जाते, विष्णू, व्दारपाल, मयुरी, माहेश्वरी, चामुंडा मूर्ती, गरुड प्रतिमा आदि शिल्पकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. तर शस्त्रास्त्र प्रदर्शनात तलवार, मराठा कट्यार - हलदाई, अमुक्त शस्त्र, स्त्रियांच्या कट्यारी, विजयनगरी कट्यार, जरनाळ, खैबर, संगीन, अंकुश, इराणी भाले, पेशकब्ज, जंबिया, खंडा तलवार, दांडपट्टा, मराठा तलवारी, पदकुंत, गजकुंत, अश्वकुंत,विटा, फरशी कु-हाड, दगडी, पोलादी तोफगोळे, कर्द, खंजराली, बिचवा, कुकरी, वाघनखं, मुघल कट्यार आदिंचे प्रदर्शन भरले आहे.  तसेच मानकरी तलवार, ब्रिटीश तलवार, समशेर, मुगल तलवार, गुर्ज, जमदाड तलवार, राजपुत तलवार, पट्टीसा, निमचा तलवार, नायर तलवार, दमास्कस पोलादाची राजपुत तलवार, तेगा तलवार, गेंड्याच्या कातडीची ढाल, फेन्सींग तलवार, शिरस्त्राण, दरस्त्राण, खोगीर आणि चिलखतींचा प्रदर्शनात समावेश आहे. या प्रदर्शनाला नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत.

वास्तुविशारद स्वप्नील श्राँफ, ऐतिहासिक शस्त्रास्त्र संग्राहक  निलेश सकट यांनी पालकमंत्र्यांना  प्रदर्शनाबाबत माहिती दिली.पालकमंत्री श्री. वळसे पाटील यांनी रंगमहालाला भेट दिली असता, सहायक संचालक अमोल गोटे रंगमहाल संवर्धनाबाबत माहिती दिली.


Post Top Ad

-->