BULDHANA माता रमाई Ramal जयंती उत्साहात साजरी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Friday, February 9, 2024

BULDHANA माता रमाई Ramal जयंती उत्साहात साजरी


आपला विदर्भ LIVE बिबी देवानंद सानप

लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची १२६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ११वा. माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बीबी पोलीस स्टेशनं चे ठाणेदार सदानंद सोनकांबळे ,सरपंच पुत्र निलेश महाजन,  ग्रा प सदस्य पती गजानन मुर्तडकर, ग्रा प सदस्य अनिस पठाण, सौं मीना शिंगणे आदींनी माता रमाईच्या प्रतिमेचे पूजन केले, प्रसंगी बुद्धभूषण मुळे यांनी डॉ बाबासाहेब याची तर कु. दिव्या शिंदे यांनी माता रमाई यांची वेशभूषा साकारली.  

यावेळी विविध कलात्मक गुणांची स्पर्धा आयोजित केली होती.संध्याकाळी ५ वा. माता रमाई यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुली, मुलं यांनी डी जे च्या तलावात ठेका धरला. मिरवणूकित पुरुष, महिला बालगोपाळ असे शेकडो च्या संख्येने सामील झाले होते.

कार्यक्रम यशस्वी ते साठी ऑल इंडिया पॅंथर सेना कार्यकर्ते, उत्सव समिती सदस्य तथा समाज बांधव यांनी अथक परिश्रम घेतले.

Post Top Ad

-->