DHANKI साखळी व आमरण उपोषण सुरवात - Apala Vidarbha LIVE

Breaking

Saturday, February 10, 2024

DHANKI साखळी व आमरण उपोषण सुरवात

साखळी व आमरण उपोषण सुरवात

दि.10/2/2024 ते 14/2/2024 पर्यंत साखळी व नंतर आमरण उपोषण

 (आपला विदर्भ ढाणकी प्रतिनिधी शेख रमजान )

ढाणकी बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बिटरगाव ,पिंपळगाव पेंधा (वन ), ढाणकी व जेवली 

या भागातून राज रोजपणे रेती तस्करी चालू आहे . अवैध रेती तस्करी बंद करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यांनी जानेवारी महिन्यात उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते पण यावर उपविभागीय अधिकारी झोपेचे सोंग घेतल्या सारखे अवैध रेती तस्करला आळा घालण्याऐवजी त्यांचे हात बळकट करत आहे  व या तक्रारीची अद्यापही कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे रेती माफीया हे आपल्या मनमर्जीने काही अधिकारी हाताशी धरून राज रोजपणे दिवसा ढवळ्या पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांच्या डोळ्यादेखत अवैद्य रेती उत्खनन करीत आहेत .निवेदन देणाऱ्यांना सोशल मीडिया द्वारे धमक्या देत असून प्रशासन रेती तस्करचे हात बळकट करत आहे असे दिसून येत आहे म्हणून 1) बिटरगांव पोलीस स्टेशन अंतर्गत चालु असलेली अवैद्य रेती उत्खनन बंद करण्यात यावी ,

2)शासनाने तात्काळ घरकुल वासियांना स्वस्त रेती डेपो चालू करून देणे

3)महसूल विभागाने पिंपळगाव वन  नाका,ढाणकी सविंधान चौक व जुना सावळेश्वर फाटा येथे महसूल तपासणी नाके चालू करणे.या मागण्या पूर्ण करण्या करिता प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,   यांच्या कडून दि१०/०२/२०२४ पासुन उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आला आहे .

Post Top Ad

-->