उद्धवजी फंगाळ यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर - Apala Vidarbha LIVE

Breaking

Monday, March 25, 2024

उद्धवजी फंगाळ यांना आंतरराष्ट्रीय पातळीचा राष्ट्रीय साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार जाहीर

 

शिर्डी माणसाला समाजाप्रती आपल्या कार्य क्षेत्रांत एका चंदना सारखं झिजाव लागतं.रात्र दिवस संघर्ष करून तिळभर ही स्वःताचा स्वार्थ न साधता. शोषित, वंचित ,पिडीत , शेतकरी कष्टकरी ,गोर गरीब, कामगार रोज मजूर शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक  क्रीडा विद्यार्थी वर्ग तसेच प्रत्येक घटकातल्या माणसांच्या व्यथा आणि भावना समजून घ्याव्या लागतात . त्यांच्या दुःखात फक्त सहभागी न होता त्यांच दुःख हे आपलं दुःख समजून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढावं लागतं .मान ,अपमान सहन करून केवळ समाजांचे हीत अनं कार्य चिरंतर करावं लागतं.स्वता:हा मागे राहून दिन दुबळ्यांना पुढे जाता येईल यासाठी धडपड करावी लागते त्यांच्यासाठीच सतत प्रयत्न करावे लागतात.शुन्यातून विश्व निर्माण करावं लागतं प्रत्येकांच्या मनाचं समाधान होई प्रयंत कष्ट करावे लागतात.जेव्हां दुःखीतांना मदत करून त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यामुळे हसू उमटतं ,तेव्हांच समाजात माणसाला ही श्रेष्ठ किंमत प्राप्त होते. आणि योग्य कार्य कर्तृत्वाचा सन्मान म्हणून समाजभूषण ही उपाधी माणसाला बहाल होते .अशीच एक समाजभूषण ही श्रेष्ठ उपाधी बहाल झालेले ता.मेहकर जी बुलढाणा येथील संघर्षाचे एक लढाऊ व्यक्तीमत्व मा.उद्धवजी फंगाळ यांच्या समाजाप्रती असलेल्या उल्लेखनीय कामगिरीची आणि कार्याची दखल घेवून त्यांचे दैदिप्यमान वास्तव काम पाहून .ओम साई विकास प्रतिष्ठान व

बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन निर्मित यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा २०२४ या वर्षीचा अतिशय मान सन्मानाचा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा

साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार २०२४ हा नुकताच त्यांना जाहीर झाला आहे . समाजभूषण म्हणून त्यांचे कार्य असे की  संघर्षाचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व उद्धवजी फंगाळ गेल्या तीस वर्षांपासून प्रत्रकारीता क्षेत्रांत पत्रकार, संपादक म्हणून काम करतं आहेत .काम करतं असताना एक निष्ठ राहून दुःखीतांच्या ,शोषितांच्या कष्टकरी कामगार ,शेतकरी ,बळीराजाच्या पाठीशी त्यांची लेखणी समक्षपणे आणि ठामपणे उभी राहीली . वास्तव भावना गोरगरीब जनतेच्या आवाजाला त्यांनी योग्य न्याय मिळवून देण्याचे काम केले . समाजातील विविध घटकांना विषयांना त्यांनी वेळोवेळी जनतेसमोर मांडले . प्रत्येकाला मदत योग्य न्याय देण्याची भुमीका त्यांनी पार पडली.प्रत्येक क्षेत्रातील दांडगा अनूभव हा त्यांना आहे.नंतर पत्रकारिता क्षेत्रात असेच पत्रकार ,संपादक म्हणून काम करतं असताना.त्यांनी आपले स्वतःहाचे एक दैनिक वृत्तपत्र सुरू केले एका नव्या युगाला प्रारंभ आणि सुरुवात केली . ज्यांचे नाव अल्पावधीतच महाराष्ट्र राज्यात लोकप्रिय झाले दैनिक साईसंध्या आणि विदर्भ सत्यजीत वृत्तपत्रांचे सिद्धहस्त संपादक मा.उद्धवजी फंगाळ म्हणून ते चर्चेत आणि प्रसिद्धीस आले .कारण त्यांचे कार्य हे पहिल्यापासूनच समाजाप्रती उल्लेखनीय होते आणि त्यापेक्षा जास्त वर्तमानात आणखी भरीव होतं गेले .

त्यांची प्रतिमा आणि प्रतिभा ह्या दोन्हीं ही शब्दांत मावनाऱ्या नाहीत. दैनिक साईसंध्या विदर्भ सत्यजीत हे वर्तमानपत्र चालवत असतांना . शोषित, वंचित‌, पिडित, गोरं ,गरीब शेतकरी ,कष्टकरी, कामगार यांच्या पाठीशी त्यांची लेखणी आधीचं उभी होती आणि राहीली ही . आपल्या मागे कुणी राहू नये म्हणून सर्वांना पुढे नेणारा हा संपादक अवघ्या महाराष्ट्रातूंन माणसे जोडत गेला . सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवत गेला . परिस्थिती खूप बिकट आली संकटे हजार आले कुणी साथ दिली कुणी सोडून गेले .पण कुठेही न डगमगता हार न मानता खंबीर नेतृत्व करतं संघर्ष करतं उद्धवजी फंगाळ साहेब यांनी कष्टांतून हे अवघे नंदनवन उभारले आहे . अनेकांच्या लेखणीला वाव देऊन त्यांनी सर्वांना पुढे नेले आहे मोठे केले आहे जे आज खूप मोठे झालेत.स्पष्टवक्तेपणा सत्य वानी निर्भिड कार्य गरजूंना मदत सर्वांना समान संधी देऊन ते आपले कामं करतं आहेत . पत्रकार, संपादक म्हणून आपली रोखठोक भुमिका बजावताना ते आज शेकडो प्रतिनिधींना एकत्र करून सामाजिक सलोखा जपत आहेत. त्यांचे हे कार्य त्यांचा हा संघर्ष एक अलैकिक प्रेरणा घेण्या सारखा आहे .सहजासहजी व्यक्तीमत्व घडतं नसतं स्वतःचा स्वार्थ न साधता सर्वांना मोठे करणे ,त्यांना दुनियेत चमकवने प्रसिद्ध करणे हे कोणाला ही करता येतं नाही . बुद्धं,फुले ,शिव, शाहू आंबेडकरी विचारांचा वसा वारसा पुढे नेत.महाराष्ट्रात कणखर दमदार निर्भिड वर्तमान पत्र चालवून राज्य आणि देशांसाठी आपले कार्य करतं राहणे कोणताही स्वार्थ न बाळगणे हाचं उद्धवजी फंगाळ साहेबांचा उदात्त हेतू आहे .आरशा सारखं आपलं प्रतिबिंब स्वच्छ ठेवून गर्व अहंकार न बाळगता साधी राहणी पण उच्च विचारसरणी जोपासून त्यांनी सर्वांना मोठे केले आहे . जनहितार्थ अगदी ग्रामीण भागांत ही आपले वर्तमानपत्र पोहचवून सकाळी आणि संध्याकाळी वृत्त वाचणात ते आनून देतं आहेत.वंचितांच्या दुःखाला न्याय मिळवून देने हे साहेबांच्या दैनिकांचे वैशिष्ट्य आहे.वर्तमान चालू घडामोडी सांज दैनिक साईसंध्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध करून सदैव तत्पर वार्तांकन ते देतं असतात.कोणाचं ही मन न  दु:खवता योग्य मार्गदर्शन करतं संपादक साहेब सर्वांना सोबत घेऊन काम करतात हे साहेबांचे असलेले मोठेपण आहे . साहित्यिकांना हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध करून रोजच्या अंकांत आध्यात्मिक लेख कविता वाचकांसाठी प्रकाशित होतात .सध्या सोशल‌ मिडिया खुप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेली आहे.व्हिडिओ चित्रफीत वार्तांकन युट्यूबवर चालू घडामोडी विशेष वार्तांकन मिडीया स्वरूपात प्रत्येका प्रयंत लाईव्ह बातमी म्हणून ते पोहचवत आहेत . उद्धवजी फंगाळ साहेब यांच्या समाजाप्रती असलेल्या याचं उल्लेखनीय गौरवशाली कार्य कर्तृत्वाची दखल घेवून आंतराराष्ट्रीय पातळीवरचा साई कलारत्न सामाजभूषण पुरस्कार २०२४ साठी त्यांची निवड केली आहे .सदर पुरस्कार आणि गौरव सोहळा हा शुक्रवार दि.३ मे २०२४ रोजी जागतिक दर्जा असलेल्या श्री साईबाबा पवित्र तिर्थक्षेत्र शिर्डी येथे पार पडणार असून.पुरस्कार गौरव सोहळा हा प्रमुख उपस्थिती म्हणून पुणे येथील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि अभिनेते मा.श्री.काळुराम ढोबळे सर व देशातील नामांकित म्हणून असलेल्या नागपूर येथील सावी उर्फ सोनी वासनीक मॅडम . तसेच लोणी प्रवरा येथील समाजभूषण मा.श्री.उत्तम काका घोगरे पाटील व औरंगाबाद  येथील प्रसिद्ध रोड काँटॅक्टर व चित्रपट  निर्माता मा.श्री.सतिष खांडविकर सर यांच्या शुभ हस्ते हा उत्कृष्ट असा आंतरराष्ट्रीय पातळीचा समाजभूषण २०२४ पुरस्कार मान सन्मानाने कार्य गौरव यथोचित सत्कार सम्मान करून उद्धवजी फंगाळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.पुरस्कार सोहळा निवड पत्र हे पुरस्कार सन्मान सोहळा समिती अध्यक्ष मा.श्री .सुदाम संसारे यांनी उद्धवजी फंगाळ यांना अधीकृत रित्या निमंत्रण म्हणून पुरस्कार स्विकारण्यासाठी दिले आहे . समाजभूषण म्हणून दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पातळीचा २०२४ हा उत्कृष्ट असा पुरस्कार मेहकर येथील समाजभूषण मा.उद्धजी फंगाळ यांना जाहीर झाला असून सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक प्रत्रकारीता तसेच सर्व क्षेत्र आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धवजी फंगाळ यांच्यावर अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होतं आहे .

Post Top Ad

-->