BULDHANA DONGAON,दुचाकीचा भीषण अपघात अपघातामध्ये तीन गंभीर जखमी - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 27, 2024

BULDHANA DONGAON,दुचाकीचा भीषण अपघात अपघातामध्ये तीन गंभीर जखमी


(Apala Vidarbha News News Network) बुलढाणा, डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जनूना ते विठ्ठलवाडी जवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातामध्ये तीन जण जखमी तर यामधील एक गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळाल्या प्राथमिक माहितीनुसार राजगड करून डोणगाव कडे येणारे दुचाकीस्वार जमुना ते विठ्ठलवाडी रोडवर हा अपघात झाला असल्याची माहिती आहे. सदर अपघातामध्ये शेषराव राठोड अंदाजे वय वर्ष 50, अक्षय राठोड वय वर्ष 35, गुलशन राठोड. राहणार उमरवाडी  जिल्हा वाशिम असे जखमी असून यांना प्राथमिक आरोग्य केंद्र डोणगाव येथे प्राथमिक उपचार करून मेहकर येथे ग्रामीण रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. सदर अपघात हा कशामुळे झाला व यामध्ये आणखी किती जखमी आहेत या संदर्भात अद्यापही कारण स्पष्ट नाही.

Post Top Ad

-->