BULDHANA JANEPHALA श्री शिवाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापकांनी घेतला गळफास.. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 27, 2024

BULDHANA JANEPHALA श्री शिवाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापकांनी घेतला गळफास..

 मुख्याध्यापकां रत्नाकर शिवाजी गवारे 
 जानेफळ येथील अत्यंत  दुर्देवी घटना आपला विदर्भ लाईव्ह (अंकुश वानखेडे जाणेफळ) 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका मधील  जानेफळ येथे मुख्याध्यापकांनी शाळेतच आपले जीवन संपवले आहे. जानेफळ येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले रत्नाकर शिवाजी गवारे वय वर्षे 55 असे मुख्याध्यापकाचे नाव असून यांनी शाळेचत गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे.11:30 च्या सुमारास शाळेतील शिपयाने  बघितले असता  गवारे यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले सदर माहिती तात्काळ जानेफळ पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामाची कारवाई केल्याची प्राथमिक माहिती आहे. मुख्याध्यापक यांनी आत्महत्या का केली कारण मात्र समजू शकले नाही पुढील तपास  पोलीस करत आहेत.

Post Top Ad

-->