BULDHANA शिवसेना शिंदे गटाचे MLA आमदार गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी भरला अर्ज - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 28, 2024

BULDHANA शिवसेना शिंदे गटाचे MLA आमदार गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी भरला अर्ज

आमदार संजय गायकवाड

 अर्ज माघार घेणार नसल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय गायकवाड यांनी म्हटल आहे

 बुलढाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांचे नाव शिंदे गटातून प्रथम असून आज त्यांच्या नावाची घोषणा व्हायची शक्यता असताना शिंदे गटाचे  बुलढाण्यचे आमदार संजय गायकवाड यांनी हा उमेदवारी अर्ज भरून मोठा संभ्रम निर्माण केल्याची चर्चा रंगत आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. यामुळे शिंदे गटासह युतीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आज गुरुवारी आमदार गायकवाड यांनी दुपारी २ च्या सुमारास अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत शिंदे गटाचे समर्थक हजर होते. तर मित्रपक्ष राष्ट्रवादी व भाजपचे पदाधिकारी हजर नव्हते.मावळते खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावाची घोषणा आज होण्याची शक्यता असतानाच आज गायकवाड यांनी तातडीने अर्ज दाखल केला.भरलेल्या उमेदवारी अर्जाची आता मात्र  चांगलीच चर्चा रंगत आहे.

Post Top Ad

-->