BULDHANA ShivSena शिवसेना उद्धव ((Balasaheb Thackeray)बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर; नरेंद्र खेडेकर सह १७ जणांना तिकीट - Apala Vidarbha LIVE

Breaking

Wednesday, March 27, 2024

BULDHANA ShivSena शिवसेना उद्धव ((Balasaheb Thackeray)बाळासाहेब ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर; नरेंद्र खेडेकर सह १७ जणांना तिकीट

 लोकसभा उमेदवार नरेंद्र खेडेकर 
बुलढाणा शिवसेना ((Balasaheb Thackeray) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी अखेर जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या लक्ष लागून असलेले बुलढाणा जिल्ह्याचे  यादीमध्ये प्रथम नाव आहे बुलढाण्यातून प्रा.नरेंद्र खेडेकर याची उमेदवारी पक्की झाली आहे. तर जिल्ह्यात होणाऱ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. 

मुंबईतील चार जागा ठाकरे गट लढवणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईतून अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईतून संजय दिना पाटील, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय कल्याण डोंबिवली, पालघर येथील उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवरुन ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. तर ईशान्य मुंबई या युतीत भाजपकडे राहिलेल्या जागेवरही ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. हातकणंगलेच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या 17 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यास येत आहे. मुंबई दक्षिण मध्य येथून अनिल देसाई यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात येत आहे." असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे. 

ठाकरे गटाची लोकसभा उमेदवार यादी जाहीर;  १७ जणांना तिकीट 

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी अखेर जाहीर झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन १७ उमेदवारांची घोषणा केली आहे. मुंबईतील चार जागा ठाकरे गट लढवणार आहे. दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबईतून अमोल कीर्तिकर, उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबईतून संजय दिना पाटील, नाशिकमधून राजाभाऊ वाजे, तर छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आले आहे. याशिवाय कल्याण डोंबिवली, पालघर येथील उमेदवारांची अद्याप घोषणा झालेली नाही. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीच्या जागेवरुन ठाकरेंनी उमेदवार जाहीर केला आहे. तर ईशान्य मुंबई या युतीत भाजपकडे राहिलेल्या जागेवरही ठाकरेंनी उमेदवार दिला आहे. हातकणंगलेच्या जागेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.


Post Top Ad

-->