Bhandara,Prataprav Jadhav हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराचे प्रचाराचे फुटले नारळ. - Apala Vidarbha LIVE

Breaking

Tuesday, April 9, 2024

Bhandara,Prataprav Jadhav हॅट्रिक पूर्ण करणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराचे प्रचाराचे फुटले नारळ.


बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र Prataprav Jadhav प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज दि 9 एप्रिल रोजी महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व लोकप्रिय आमदार सौ.श्वेताताई महाले-पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा अबकी बार ४०० पार हा नारा यशस्वी करण्यासाठी व विकसित भारताच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी सज्ज राहावे. विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी वाटचाल करणारे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्याचा निर्धार करत बुलडाणा लोकसभेवर पुन्हा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प यावेळी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी हभप प्रकाश बुवा जवंजाळ,
भाजपचे ज्येष्ठ नेते विजय कोठारी,डाॅ.प्रतापसिंह राजपूत,रयत क्रांती संघटनेचे प्रशांत ढोरे,रिपाई चे जिल्हाध्यक्ष नरहरी गवई,कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष विजयभाई गवई,राष्ट्रवादीचे शंतनु बोंद्रे,भाजपचे प्रदेश प्रवक्ते. विनोद वाघ,भाजपचे नेते देविदास जाधव,शेख अनिस भाई,व महायुती चे प्रमुख पदाधिकारी व तसेच महायुती मधील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Top Ad

-->